पाकिस्तान करणार चीनला सहकार्य!

सिंकियांग या चीनच्या वायव्येकडील प्रांतामधील नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानशी मतभेद झाल्याच्या वृत्ताचा चीनने आज (गुरुवार) इन्कार केला.

Updated: Aug 4, 2011, 08:02 AM IST

झी 24 तास वेब टीम, बीजिंग

 

सिंकियांग या चीनच्या वायव्येकडील प्रांतामधील नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानशी मतभेद झाल्याच्या वृत्ताचा चीनने आज (गुरुवार) इन्कार केला. याउलट, दहशतवादाच्या बीमोडासाठी पाकिस्तानच्या सहकार्याने नवीन योजना राबविण्यात येणार असल्याचे चीनने सांगितले आहे.

 

चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ""दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी कारवाया या तीन घटकांविरुद्ध चीन आणि पाकिस्तान एकत्रित कारवाई करतील,'' असे चिनी परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ता मा झावू यांनी सांगितले. पाकिस्तान दहशतवादाच्या बीमोडासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य असल्याचेही यावेळी झावू यांनी स्पष्ट केले.

 

सिंकियांगमधील काश्‍घर येथे नुकत्याच झालेल्या हिंसाचारात 20 जणांचा मृत्यू झाला होता. या अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असणारे दहशतवादी पाकिस्तानमधून प्रशिक्षित होऊन आल्याचा आरोप चीनमधील माध्यमांनी केला होता.

Tags: