www.24taas.com, वॉशिंग्टन
इराणकडून तेल आयात करताना काही अडचण येऊ नये यासाठी अमेरिकेने काही गोष्टींचा विचार करता चीनशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. इराणवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिका आता चीनची मदत घेतली आहे. नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर ओबामा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चीन सोबत आम्ही चर्चा केली आहे. आम्ही चीनसोबत सतत चर्चा करीत आहोत. इराण कडून सगळ्याता जास्त तेल हे चीन आयात करीत आलं आहे.
अमेरिकेने कालच स्पष्ट केलं की, भारत आणि इतर सहा देशांना आर्थिक बाबींमध्ये सुट देणार असल्याचे परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटनने काल जाहीर केलं. भारत, मलेशिया, कोरिया, तुर्कस्तान, ताईवान, द. आफ्रिका, श्रीलंका, यांना इराण कडून तेलाची आयात कमी होत आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, चीन आणि अन्य देशांना इराण तेल आयात करीत असले तरी आम्हांला काही कायद्याच्या बाबी पडताळून पाहाव्या लागतील . चीन स्वत: चार वेगवेगळ्या गोष्टीवर इराणवर प्रतिबंध लावण्यासाठी त्यांच्याविरोधात मतं दिली आहेत.