ओबामांच्या बदल्यात उंट, क्लिंटनच्या बदल्यात कोंबड्या

अल-कायदाशी संबंधित एका प्रमुख नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बदल्यात १० उंट आणि अमेरिकेची परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची माहिती देण्याच्या बदल्यात २० कोंबडे-कोंबड्या बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.

Updated: Jun 11, 2012, 09:07 AM IST

www.24taas.com, लंडन

अल-कायदाशी संबंधित एका प्रमुख नेत्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बदल्यात १० उंट आणि अमेरिकेची परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची माहिती देण्याच्या बदल्यात २० कोंबडे-कोंबड्या बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.

डेली मेल मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सोमालियातील अल-शबाब या आतंकवादी संघटनेचा सिनियर कमांडर फौद अहमद खलफ याने ओबामा यांच्या मंत्रिमंडळातील ७ प्रमुख सदस्यांची माहिती देणाऱ्यास ३३० लाख डॉलर्स बक्षिस देण्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर अल-कायदाने ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्यावर इनाम लावल्याची घोषणा केली आहे.

खलफ यांनी अमेरिकेच्या घोषणांना मुस्लिमविरोधी आणि आक्रमक असल्याचं म्हणत अमेरिकन नेत्यांना ‘काफिर’ म्हटलं आहे. ‘जो कुणी ओबामा आणि हिलरी यांचा पत्ता मुजाहिद्दिनला देईल, त्यास ओबामांच्या बदल्यात १० उंट आणि हिलरी क्लिंटन यांच्या बदल्यात १० कोंबड्या बक्षिस देण्यात येईल.’