बाबा रामदेव जीन्ससहीत करणार परदेशातील बाजारात एन्ट्री

योगगुरू बाबा रामदेव यांचा 'स्वदेशी' हा ब्रॅन्ड आता फॅशन इंडस्ट्रीतही पदार्पण करत आहे.  

Updated: Sep 10, 2016, 07:11 PM IST
बाबा रामदेव जीन्ससहीत करणार परदेशातील बाजारात एन्ट्री  title=

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांचा 'स्वदेशी' हा ब्रॅन्ड आता फॅशन इंडस्ट्रीतही पदार्पण करत आहे.  

जीन्स आणि फॉर्मल ड्रेस अशा दोन्ही प्रकारातील कपडे 'स्वदेशी' बाजारात आणणार आहे. हा ब्रॅन्ड बांग्लादेश आणि आफ्रिकेतही आपलं प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. यामुळे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एन्ट्री करण्याची संधीही मिळणार आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, पुरुष आणि महिला दोघांसाठीही या जीन्स असणार आहेत. आपण आधुनिकता आणि अध्यात्मिकता सोबत घेऊन चालू शकतो, असा संदेशही रामदेव बाबा यातून देत आहेत. 

रामदेव आपला शिष्य बाळकृष्ण याच्यासोबत हरिद्वारमध्ये आपला कॅम्पस आणि त्याबाहेर अनेक एन्टरप्रायजेस चालवतात. आपण नेपाळच्या बाजारातही प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय.