Year Ender 2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना

२०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या. 

Updated: Dec 18, 2015, 02:15 PM IST
Year Ender  2015 : गुन्हेगारी विश्वातील उल्लेखनीय घटना title=

मुंबई : २०१५ या सालात अनेक धक्कादायक घटना घडल्या आणि उघडकीसही आल्या... अंगावर शहारे उभ्या करतील अशा या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना होत्या. 

शीना बोरा हत्याकांड (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)
अत्यंत किचकट आणि नात्यांची गुंतागुंत असणारं प्रकरण म्हणजेच शीना बोरा हत्याकांड.... स्टार टीव्हीचे माजी सीईओ पीटर मुखर्जी, त्यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा ड्रायव्हर शामवीर आणि इंद्राणीचा पूर्व पती संजीव खन्ना यांना शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलीय.

शीना बोरा ही इंद्राणीची बहिण नसून मुलगी होती, हे धक्कादायक सत्य इंद्राणीच्या अटकेनंतर सगळ्या जगाला तर कळलच परंतु, हे सत्य तिच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळींसाठीही धक्कादायक होतं.

अधिक वाचा - शीना हत्येत पीटर मुखर्जी मास्टरमाईंड?

अधिक वाचा - शीना बोरा हत्याकांड : प्रकरण दाबलं जात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं होतं - इन्स्पेक्टर

अधिक वाचा - एक्सक्लुझिव्ह : शीना डायरीत म्हणते, इंद्राणी आई नाही तर चेटकीण आहे!

अधिक वाचा - एक्सक्लुझिव्ह : आपल्या वडिलांसाठी शीनानं लिहिलेलं पत्रं!

अधिक वाचा - पुन्हा TWIST : शीना बोरा जिवंत? हत्या झालीच नाही?

अधिक वाचा - Exclusive: इंद्राणीसोबत लग्न केलं नाही, शीना-मिखाईल माझीच मुलं - सिद्धार्थ दास

अधिक वाचा - शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली

 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला अटक (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

इंडियाचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन ऊर्फ सदाशिव निकाळजे ऊर्फ मोहन कुमार याला इंडोनेशियातील बाली इथं अटक करण्यात आली. 

मूळचा मुंबईचा राहणाऱ्या ५५ वर्षीय माफिया डॉनचे मूळचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दोन दशकांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या छोटा राजनला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली. तो सध्या भारताच्या ताब्यात आहे. सध्या त्याला कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात आले आहे

सुमारे पाऊणशे खटले छोटा राजनची वाट बघत आहेत. किडनीच्या विकारानं त्रस्त असलेल्या राजनच्या डायलिसिसची व्यवस्था, तसंच खटला चालवण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय केली जाण्याची शक्यता आहे.  

अधिक वाचा - जाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन

अधिक वाचा - छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

अधिक वाचा - काळ्या धंद्यातून जमा केलेली छोटा राजनची डोळे दीपवणारी संपत्ती

अधिक वाचा - छोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ

अधिक वाचा - काही मुंबई पोलिसांचेच दाऊदशी लागेबांधे; छोटा राजनचा दावा

अधिक वाचा - झी स्पेशल : छोटा राजनच्या मदतीनं तपास यंत्रणांचं 'डी ऑपरेशन'

 

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : याकूब मेमनला फाशी (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

३० जुलै रोजी सकाळी ६.३० च्या सुमारास मुंबईतल्या 1993 बॉम्बस्फोटाचा दोषी याकूब मेमन फासावर चढवण्यात आलं. राष्ट्रपतींनी याकूबची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर याकूबच्या वकिलांनी याकूबच्या बचावासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'बचावा'चा प्रयत्न केला. पण, यात त्यांना यश मिळालं नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच देशातल्या सर्वोच्च न्यायालायनं ३० जुलै रोजी पहाटे चार वाजून अठ्ठवन्न मिनिटांनी याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं. 

फाशीनंतर मुंबईच्या मरिन लाइन्स भागातील ७.५ एकरच्या बड़ा कब्रीस्तानमध्ये दफनविधी झाला. यावेळी, मोठा जमाव याकूबच्या दफनविधीसाठी उपस्थित होता, हे विशेष. 

अधिक वाचा - नेमकी कशी झाली होती याकूब मेमनला अटक...

अधिक वाचा - 'ते' बेचैन आठ तास... आणि याकूबची जगण्याची व्यर्थ धडपड!

अधिक वाचा - बॉलिवूड स्टार आणि अंडरवर्ल्ड डॉन शेजारी दफन करण्यात आले याकूबला

अधिक वाचा - याकूबचा 'निकाल' लावणाऱ्या न्यायमूर्तींना धमकी

अधिक वाचा - याकूबच्या फाशीनंतर टायगर मेमननं केला आईला फोन...

अधिक वाचा -याकूब मेमनच्या दफनविधीसाठी होती दाऊदच्या वफादारांची फौज

अधिक वाचा - नागपुरात स्फोट करण्याचा इशारा, याकूबच्या फाशीनंतर धमकी