मुरादाबाद : उत्तरप्रदेशात धक्कादायक बाब उघड झाली आहे. सातत्याने तास न तास मोबाईल बोलणाऱ्या बहिणीचा भावाने काटा काढला. रागाच्या भरात बहिणीची हत्या केल्याचे पुढे आले आहे.
मुरादाबाद येथील रुबीन (नाव बदलले आहे. )या १८ वर्षीय तरुणीची तिचा भाऊ अस्लम याने हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबीन ही मुरादाबादमधील लकडी फजलपूर या गावात आपल्या वडिलांसोबत राहते. तिचा मोठा भाऊ अस्लम हा कामानिमित्त दिल्लीला राहतो. परंतु शुक्रवारी ईद सण साजरा करण्यासाठी गावाकडे आला. बहिण रुबीन ही कोणासोबत तरी तास न तास बोलत असल्याचे अस्लमच्या लक्षात आल्याने तिला याबाबत वडील आणि भाऊ अस्लमने जाब विचारला. तिला मारहाण करण्यात आली मात्र याबाबत काहीही सांगण्यास रुबीनने नकार दिला.
रुबीन ही दरवाजा बंद करून फोनवर कोणाशी तरी बोलत राहिल्याने अस्लमचा रागाचा पारा चढला. रागाच्या भरातच त्याने रुबीनची हत्या केली. रुबीन हिचा डिसेंबर महिन्यात विवाह होणार होता, अशी माहिती ग्रामस्था दिली. आरोपीनी हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.