स्पेक्ट्रम युजेज चार्जेस कमी, आता कॉल दर घटणार

टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरकनेक्ट वापर शुल्क (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे  कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 6, 2016, 12:09 PM IST
स्पेक्ट्रम युजेज चार्जेस कमी, आता कॉल दर घटणार title=

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरकनेक्ट वापर शुल्क (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे  कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.

‘ट्राय‘ने मोबाईलचे इंटरकनेक्शन युसेज चार्ज (आययूसी) शुल्क ५ टक्के घेत होती. आता हा दर ३ टक्के करण्याची तयारी करण्यात येणार आहे. त्यामुळे मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाईल कंपन्यांची ३२०० कोटींची बचत

जुलैमध्ये सरकार २००० मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमचा लिलाव ७ फ्रिक्वेंसीज प्रमाणे करणार आहे. त्याआधी हा निर्णय घेतल्याने उद्योगला आधार मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोबाईल कंपन्यांना ३२०० कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.