www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्यात (डीए-डिअरनेस अलावन्स) १० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. सध्या कर्मचार्यांचना मूळ पगाराच्या ८० टक्के महागाई भत्ता दिला जातो. त्यात आणखी १० टक्क्यांची वाढ करून तो ९० टक्क्यांवर नेण्याचा प्रस्ताव आहे. देश देशातील तब्बल ५० लाख कर्मचारी आणि ३० लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत या प्रस्तावावर विचारविनिमय होईल. प्रस्तावातील बदल मंजूर झाल्यास यावर्षी एक जुलैपासून ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल.
संबंधित प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यास सुमारे तीन वर्षांनी दोन आकड्यांमध्ये वाढ मिळणार आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१० मध्ये सरकारनं महागाई भत्त्यात १0 टक्के वाढ केली होती. यावर्षीही एप्रिलमध्ये ८ टक्के वाढ दिली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.