शौचालयासाठी पत्नीला चढावी लागली कोर्टाची पायरी

पक्क्या शौचालयाची मागणी पूर्ण न करणाऱ्या पतीला पत्नीनं सोडून देण्याची घटना देवास जिल्ह्यात घडली. या साध्या-सुध्या मागणीसाठी पत्नीला कोर्टाची पायरीही चढावी लागली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 26, 2013, 04:28 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इंदूर
महागडे कपडे, सोन्या-चांदीचे-हिऱ्यांचे दागिने... अशा महागड्या वस्तुंची मागणी पूर्ण न केल्यानं रागावून आपल्या पतीचं घर सोडणाऱ्या अनेक महिला तुम्ही पाहिल्या आहेत. पण, पक्क्या शौचालयाची मागणी पूर्ण न करणाऱ्या पतीला पत्नीनं सोडून देण्याची घटना देवास जिल्ह्यात घडली. या साध्या-सुध्या मागणीसाठी पत्नीला कोर्टाची पायरीही चढावी लागली.
२७ वर्षीय सविताचा विवाह मुंडलाआना येथील देवकरण मालवीय याच्याशी सात वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर सासरी शौचालय नसल्याने रोज कुचंबणा सहन करीत असलेल्या सविता मालवीय नावाच्या एका अभिमानी महिलेने माहेरचा रस्ता धरला. तिला परत घरी येण्यासाठी राजी करण्यासाठी पती देवकरण यानं तिला ‘पक्कं शौचालय’ बांधून देण्याचं आश्वासन दिलं.
सविता आपल्या सासरी परतली. त्यानंतर या दांम्पत्याला दोन मुलंही झाली. पण, सवितीच शौचालयाची मागणी काही देवकरणनं पूर्ण केली नाही. त्यामुळे संतापलेल्या सवितानं आपल्या मुलांसह पुन्हा एकदा माहेरचा रस्ता धरला... यावेळी पतीच्या पोकळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता तीनं आपल्या पतीविरुद्ध खठलाही दाखल केला.
सुनावणी दरम्यान घराला शौचालय नसल्याची बाब समोर आली, त्यावेळी देवकरणने पक्के शौचालय बांधण्याचे आश्वाणसन दिले... आणि त्यानंतर सविता आपल्या सासरी परतली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.