नवी दिल्ली : 'रमझान एक पवित्र सण आहे. त्यामुळे या पवित्र सणाचं राजकारण होऊ नये असं वाटतं आणि रमझानचं राजकारण करण्याचं पाप मी करणार नाही, ' असं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं, मोदींनी हे उत्तर २०११ सालीच दिलं होतं.
मोदींचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्योगपती जाफर सरशेवाला यांनी २०११ साली मोदींना एक प्रश्न विचारला होता, मोदी तुम्ही इफ्तार पार्टीत सहभागी का होत नाहीत? त्यावेळी मोदींनी सरशेवाला यांनी हे उत्तर दिलं होतं.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोनवेळा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. मात्र, दोन्ही वेळा पंतप्रधान मोदी इफ्तार पार्टीत सहभागी झाले नाहीत.
अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी अनेकवेळा रमझानदरम्यान इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि त्यांनी उपस्थितीही लावली होती. हल्ली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही इफ्तार पार्टीचं आयोजन करु लागलं आहे. याच वर्षी संघाने पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी देशभरातून मुस्लीम बांधवांनी उपस्थिती लावली होती.
भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना मोदींनी कधीच इफ्तारमध्ये सहभाग घेतला नाही किंवा कोणयत्याही इफ्तार पार्टीचं आयोजनही केलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.