हा २२ वर्षांचा मुलगा मोदींना चॅलेन्ज करतोय....!

हार्दिक पटेल या २२ वर्षांचा युवक अचानक टीव्ही न्यूज आणि इंटरनेट मीडियावर झळकला. हार्दिक नजर पोहोचत नव्हती एवढ्या मोठ्या समुदायाला संबोधित करत होता.

Updated: Aug 26, 2015, 10:43 AM IST
हा २२ वर्षांचा मुलगा मोदींना चॅलेन्ज करतोय....! title=

अहमदाबाद : हार्दिक पटेल या २२ वर्षांचा युवक अचानक टीव्ही न्यूज आणि इंटरनेट मीडियावर झळकला. हार्दिक नजर पोहोचत नव्हती एवढ्या मोठ्या समुदायाला संबोधित करत होता.

हार्दिक पटेलची एका दिवसात सोशल नेटवर्किंगवर चर्चा सुरू झाली. यावरून अनेकांना प्रश्न पडतोय, कोण आहे हार्दिक पटेल.

गुजरातच्या भाजप सरकारला अडचणीत आणणारा हार्दिक पटेल, हा कढी तालुका भाजपा कार्यकर्ता भरतभाई पटेल यांचा मुलगा आहे.

अहमदाबादच्या सहजानंद कॉलेजमधून हार्दिक पटेलने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

पटेल समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा, यासाठी मागील काही वर्षांपासून पटेल समाज आंदोलन करतोय.

या आंदोलनाची कमान आता हार्दिक पटेलच्या हातात आहे. कॉमर्सचे विद्यार्थी असलेले हार्दिक पटेल यांनी ठरवलं आहे, गुजरात सरकारकडून जोपर्यंत पटेल समाजाला ओबीसीचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही.

हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली मागील ४० दिवसांपासून गुजरातमध्ये पटेल समाजाचं आंदोलन सुरू आहे. यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली आहे.

या आंदोलनाचा दबाव केंद्रातील मोदी सरकारवरही दिसून येतोय. या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकास मॉडेलवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

पटेल समाजाचं आरक्षणासाठी मागील ३० वर्षांपासून आंदोलन सुरू आहे, ३० वर्षाआधी या आंदोलनसमोर तत्कालीन सरकारला गुडघे टेकावे लागले होते.

फेब्रुवारी १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत १४८ जागांसह बहुमत असतांनाही पटेल समाज रस्त्यावर आंदोलन करत असल्याने, मुख्यमंत्री माधव सिंह सोलंकी यांना राजीनामा द्यावा लागला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.