अहमदाबाद : पटेल समुदायाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सूरत आणि मेहसाणामध्ये मंगळवारी कर्फ्यू लावण्यात आला, सुरतमध्येही कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही हिंसा उसळली आहे.
अहमदाबाद आणि मेहसाणा समवेत काही ठिकाणी पोलिस आणि सुरक्षा रक्षक दलांना तैनात करण्यात आले आहे. हिंसक घटनांकडे पाहून प्रशासनाने राज्याच्या सर्व शिक्षण संस्थांना शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पटेल समुदायने बुधवारी गुजरात बंदची हाक दिली आहे.
मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी लोकांनी शांती ठेवण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी लोकांना राज्यात शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी रात्री आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली. काही सरकारी बसच्याही काचा फोडल्या.
या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलला पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतल्यानंतर हिंसा वाढली आहे. हार्दिक पटेल समर्थकांनी ५० पेक्षा जास्त बस पेटवून दिल्या. शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हार्दिक पटेल या २२ वर्षांचा युवक आहे.
हार्दिकने मंगळवारी अहमदाबादच्या जीएमडीसी मैदानात रॅलीचं आयोजन केलं होतं. येथे लाखोंच्या संख्येत जनसमुदाय सकाळपासून जमा होत होता. हार्दिक पटेलने मैदानातील लोकांना तोपर्यंत हटू नका असं सांगितलं होतं, जोपर्यंत मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल या निवेदन घेण्यासाठी येत नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.