शाळेच्या वेबसाईटवर अचानक सुरु झाले पोर्न व्हिडिओ

पंजाबमधील एका खाजगी शाळेच्या वेबसाईटवर अचानक पोर्न व्हिडिओ दिसू लागल्याने पालक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

Updated: Aug 21, 2016, 03:41 PM IST
शाळेच्या वेबसाईटवर अचानक सुरु झाले पोर्न व्हिडिओ title=

जालंधर : पंजाबमधील एका खाजगी शाळेच्या वेबसाईटवर अचानक पोर्न व्हिडिओ दिसू लागल्याने पालक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

शाळेच्या वेबसाईटला हॅक करुन त्यावर पोर्न व्हिडियो अपलोड करण्यात आले. ज्यामुळे पालकांसहीत शाळा व्यवस्थापनेलाही मान खाली घालावी लागली.

प्रिन्सिपलची ईमेल देखील हॅक करुन विद्यार्थांच्या पालकांना पैशाची मागणी केली. जेव्हा हे ईमेल पालकांपर्यंत पोहोचले तेव्हा शाळेच्या फोनची घंटी वाजण्यास सुरुवात झाली. प्रिन्सिपलने सांगितलं की हे त्यांनी पाठवले नसून त्यांचा आयडी हॅक झाला आहे.