नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या योजनेनंतर भारताच्या परदेशी धोरणांमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला इशाला दिला आहे. गरज पडल्यास भारत अणू बॉ़म्बचा आधी वापर करु शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. पण नंतर या वक्तव्यापासून त्यांनी सावध भूमिका घेतली. रक्षा मंत्रालयाने म्हटलं की ते पर्रिकरांचं वैयक्तीक मत असू शकतं. ते संरक्षम मंत्रालयाचं अधिकृत मत नाही.
अणू बॉम्ब संदर्भातील धोरणाबाबत प्रश्नावर बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. लोकं म्हणतात की, भारत आधी अणू बॉम्ब वापरण्याच्या विचारात नाही आहे. अणू शक्ती असणारा भारत एक जबाबदार देश आहे. त्यामुळे माझ्याकडून काहीही गैरजबाबदार पाऊल उचललं जाणार नाही. असं देखील त्यांनी म्हटलं.
समोरील राष्ट्र धमकी देतो की सुरक्षेचा प्रश्न आला तर आम्ही अणू बॉम्ब वापरु पण सर्जिकल स्ट्राईकनंतर असं काहीही झालं नाही. तुमच्याबाबत कोणीही पूर्वग्रह नाही ठेवू शकत. हा रणनीतीचा भाग आहे. पण तुमच्याकडे काही गोष्टी ठरवलेल्या असल्या पाहिजे. देशाच्या सुरक्षेचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा त्या आधीपासून ठरलेल्या गोष्टीवर अजून विचार नाही करायचा. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. अशी माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.