गरज पडल्यास आधी अणूबॉम्ब वापरु शकतो - संरक्षणमंत्री
पंतप्रधान मोदींच्या योजनेनंतर भारताच्या परदेशी धोरणांमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या एका वक्तव्याने खळबळ माजली आहे. मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला इशाला दिला आहे. गरज पडल्यास भारत अणू बॉ़म्बचा आधी वापर करु शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. पण नंतर या वक्तव्यापासून त्यांनी सावध भूमिका घेतली. रक्षा मंत्रालयाने म्हटलं की ते पर्रिकरांचं वैयक्तीक मत असू शकतं. ते संरक्षम मंत्रालयाचं अधिकृत मत नाही.
Nov 10, 2016, 11:55 PM IST