www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर कडव्या शब्दांत टीका करणारे काँग्रेसचे केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
जे आपल्या राज्यात पीडितांना वाचवू शकले नाहीत त्यांना आणखी दुसरं काय म्हणणार असा सवाल त्यांनी केलाय. गोध्रा हत्याकांड मोदींच्या कार्यकाळात झालं त्यामुळं त्यांनी ते मान्य तरी करावं नाहीतर आपण जे केलं ते योग्य केलं असं तरी स्पष्ट करावं अशी मागणीही त्यांनी केली. त्यामुळं खुर्शीदांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.
निवडणुकांआधीच राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी फारुखाबादमध्ये बोलता बोलता सभ्यतेची मर्यादा ओलांडली. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर त्यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली त्यामुळं वाद निर्माण झाल. नरेंद्र मोदी गोध्रा दंगल रोखण्यात अपयशी ठरल्याचं वक्तव्य करत सलमान खुर्शीद यांनी मोदींना नंपूसक म्हटलंय.तसंच हरेन पंड्यांच्या हत्येलाही मोदीच जबाबदार असल्याचीही टीकाही त्यांनी नाव न घेता केलीय.
विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेश गुजरातपेक्षा पुढे असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी सलमान खुर्शीदांवर हल्लाबोल केलाय. भाजपच्या माफीनाम्याचाही खुर्शीदांनी खऱपूस समाचार घेतलाय. माफी नेमकी कशासाठी मागत आहात आधी ते भाजपनं स्पष्ट करावं. आणि माफी मागायचीच असेल तर केवळ मुस्लीमांची न मागता सा-या देशाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलाय.
जर भाजपकडून काही चुका झाल्या असतील तर मुस्लिमांची नतमस्तक होऊन माफी मागू असं वक्तव्य भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी काल दिल्लीत केलं होते. राजनाथ सिंहांच्या माफिनाम्यावर शिवसेनेनंही सवाल उपस्थीत केलाय. नेमकी माफी कशासाठी मागताय असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.