विजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम

हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलेल्या विजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम आहे. माझ्यावर होत असलेली कारवाई ही पूर्वग्रहदूषीत असल्याचा दावा विजय मल्ल्यानं केलाय.

Updated: Jun 13, 2016, 05:47 PM IST
विजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम title=

नवी दिल्ली : हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलेल्या विजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम आहे. माझ्यावर होत असलेली कारवाई ही पूर्वग्रहदूषीत असल्याचा दावा विजय मल्ल्यानं केलाय.

नुकतीच ईडीनं म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं विजय मल्ल्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. देशातील विजय मल्ल्याची काही पॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. एकतर्फी ही कारवाई होत असल्याचा कांगावा विजय मल्ल्यानं केलाय. ईडीनं विजय मल्ल्याला चौकशीला हजर राहण्याबाबत तीन समन्स बजावले. मात्र मल्ल्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. इंग्लंड सोडण्याचा आपला अजिबात विचार नसल्याचं मल्ल्यानं एका मुलाखतीत म्हटलंय.