आता माजी सैनिकांची शौर्य पदक 'वापसी'

पुरस्कार वापसीचं वादळ शांत होतं नं होतं. तोच आज माजी सैनिकांनी आपली शौर्य पदकं परत करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Nov 10, 2015, 04:05 PM IST
आता माजी सैनिकांची शौर्य पदक 'वापसी'  title=
संग्रहीत

 नवी दिल्ली : पुरस्कार वापसीचं वादळ शांत होतं नं होतं. तोच आज माजी सैनिकांनी आपली शौर्य पदकं परत करण्याचा निर्णय घेतलाय.

दिवाळीआधी सरकारनं वन रॅंक वन पेन्शन योजना लागू करताना पाच पैकी फक्त दोन मागण्या लागू केल्यात. त्यामुळे OROPच्या अधिसूचनेवर नाराज होऊन माजी सैनिकांनी आता आपली पदक परत करण्याची मोहीम सुरू करण्याचा इशारा दिलाय.

पण माजी सैनिकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणं शक्य नसल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय.  त्यामुऴे देशात असहिष्णूतेवरून उठललेलं वादळ शमतं न शमतं तोच सरकारसमोर आणखी एक वादळ उभं राहिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.