सोनाक्षी आणि किरण खेर घेतायेत सब्सिडीतील धान्य!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण खेर जर उत्तराखंडच्या गावात सब्सिडीवालं धान्य रांगेत लागून घेत असले तर... हो असं घडतंय उत्तराखंडच्या रुडकी या गावात. 

Updated: Oct 17, 2014, 02:02 PM IST
सोनाक्षी आणि किरण खेर घेतायेत सब्सिडीतील धान्य! title=

रुडकी, उत्तराखंड: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, किरण खेर जर उत्तराखंडच्या गावात सब्सिडीवालं धान्य रांगेत लागून घेत असले तर... हो असं घडतंय उत्तराखंडच्या रुडकी या गावात. 

उत्तराखंडच्या तीन महिलांच्या रेशन कार्डमध्ये या बॉलिवूड अभिनेत्रींचा फोटो छापलेला आहे. मीना देवीच्या रेशन कार्डवर सोनाक्षी सिन्हा, उषाच्या कार्डवर किरण खेर यांचे फोटो आहेत. धक्कादायक म्हणजे 1986मध्ये मृत्यू झालेल्या अभिनेत्री स्मिता पाटील यांचाही फोटो सरिता नावाच्या महिलेच्या रेशन कार्डवर छापलाय. 

नियमानुसार घरातील सर्वात मोठ्या महिलेच्या नावानं सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत धान्य वाटप केलं जातं. रेशन कार्डवर फोटो असणंही आवश्यक असतं. याबाबत आता तपास करणारे जिल्हाधिकारी पंदियन शर्मा म्हणाले, 'हे तीन रेशन कार्ड आमच्या नजरेस आले आहेत. ज्या दुकानात ही गडबड झाली त्यांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशी अंती दोषींवर कारवाई केली जाईल'.

एकूणच काय तर रेशन कार्डमधील आणखी एक घोटाळा यानिमित्तानं समोर आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.