क्रूरतेचा कहर : १५ वर्षांच्या मुलीनं प्रियकरासोबत केली आई-वडिलांची हत्या!

गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय मुलीनं आपल्या आवडत्या मुलाला नकार देणाऱ्या आई-वडिलांची राहत्या घरातच हत्या केली... एव्हढंच नाही, तर ही गोष्ट कुणालाही कळू नये यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेल्या ७२ दिवसांपासून आई-वडिलांच्या मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न ती करत होती... आणि या कृत्यासाठी तिचा प्रियकरही तिला मदत करत होता.  

Updated: Oct 17, 2014, 01:49 PM IST
क्रूरतेचा कहर : १५ वर्षांच्या मुलीनं प्रियकरासोबत केली आई-वडिलांची हत्या!   title=

नवी दिल्ली : गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १५ वर्षीय मुलीनं आपल्या आवडत्या मुलाला नकार देणाऱ्या आई-वडिलांची राहत्या घरातच हत्या केली... एव्हढंच नाही, तर ही गोष्ट कुणालाही कळू नये यासाठी ही अल्पवयीन मुलगी गेल्या ७२ दिवसांपासून आई-वडिलांच्या मृतदेहावर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न ती करत होती... आणि या कृत्यासाठी तिचा प्रियकरही तिला मदत करत होता.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्रूर मुलीचं वय अवघं १५ वर्षांचं आहे... ही मुलगी दहावी इयत्तेत शिकते... आणि ज्या कुटुंबाला तिनं मृत्यूच्या दारात ढकललं त्या कुटुंबानं तिला दत्तक घेतलं होतं. 

या मुलीचे एका २१ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते... आई – वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला विरोध केला... त्यामुळे चिडलेल्या मुलीनं हे पाऊल उलचललंय. 
६३ वर्षीय हरि पुरुषोत्तम आणि त्यांची पत्नी स्नेहा यांचे सडलेले आणि अॅसिडनं अर्धवट जळालेले मृतदेह पोलिसानी वडोदराच्या त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ऑगस्ट रोजी या मुलीनं आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आई-वडिलांच्या जेवणात गुंगीचं औषध टाकलं... जेव्हा ते बेशुद्ध झाले तेव्हा शरीरात चाकू खूपसून त्यांची हत्या करण्यात आली. 

हे दोघंही आपला गुन्हा लपवण्यासाठी गेल्या ७२ दिवसांपासून मृतदेहांवर अॅसिड टाकून जाळण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, पुरुषोत्तम यांचा एक भाडेकरू भाडं देण्यासाठी या घरी आला होता... त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

आई-वडिलांच्या हत्येनंतर आपल्या प्रियकरासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारी ही मुलगी सध्या गर्भवती असल्याचं सांगण्यात येतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.