देहरादून : उत्तराखंडमध्ये भाजपनं आपलं व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केलंय. यात पक्षानं मतदारांना गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन, वायफाय फ्री देण्याचं आश्वासन दिलंय.
केंद्रात भाजप सरकार असल्यानं उत्तराखंडमध्येही भाजपचं सरकार असेल तर राज्याचा विकास होईल, असं केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेता अरुण जेटली यांनी म्हटलंय.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सरकार स्थिर नाही... असं म्हणत व्हिजन डॉक्युमेंटमध्ये 100 दिवसांच्या आता लोकपाल नियुक्त करण्याचाही संकल्प जेटली यांनी व्यक्त केला.
24 तास वीज देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही भाजपनं आश्वासन दिलंय.