उत्तरप्रदेशमध्ये आज तिस-या टप्प्यातील मतदान सुरू

उत्तर प्रदेशमध्ये तिस-या टप्प्यात 69 जागांसाठी आज मतदान होतंय. 12 जिल्ह्यातील 826 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. यांत समाजवादी पार्टी, बसपा आणि भाजपचं वर्चस्व असलेले सात जिल्हे आहेत. 

Updated: Feb 19, 2017, 08:38 AM IST
उत्तरप्रदेशमध्ये आज तिस-या टप्प्यातील मतदान सुरू title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये तिस-या टप्प्यात 69 जागांसाठी आज मतदान होतंय. 12 जिल्ह्यातील 826 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. यांत समाजवादी पार्टी, बसपा आणि भाजपचं वर्चस्व असलेले सात जिल्हे आहेत. 

लखनऊ, फरुखाबाद, हरदोई, कानपूर ग्रामीण, कानपूर शहर, मैनपुरी, कन्नौज, इटावा, औरिया, बाराबंकी या 12 जिल्ह्यात मतदान होतंय. तिस-या टप्प्यात जवळपास पावणे तीन कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. 

आज होणा-या मतदानासाठी तब्बल 17 हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. रविवारी होणा-या मतदानासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आलीय.. तिस-या टप्प्यात अडीचशे उमेदवार करोडपती आहेत. तर 110 उमेदवार हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.