भोपाळ: खेळता खेळता एक लहानगा प्रेशर कुकरमध्ये अडकला आणि त्याच्या घरच्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला... ही घटना आहे मध्य प्रदेशमधली. सुमारे पाच वर्षांचा मुलगा कुकर डोक्यात घालण्याचा खेळ खेळत होता. नेमकं त्याचं डोकं कुकरमध्ये अडकलं. मात्र मुलाचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करुनही घरच्यांना ते जमलं नाही.
तेव्हा अखेर करवत घेऊन कुकरच कापण्यात आला आणि सुमारे पाऊण तासानं मुलाचं डोकं सुखरुपपणे कुकरमधून बाहेर काढलं गेलं.
पाहा व्हिडिओ:
(सौजन्य ANI)
5-year old child gets his head stuck in a pressure cooker in Narsinghpur (MP), rescued safely. pic.twitter.com/0dZ2xt5hQE
— ANI (@ANI_news) September 6, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.