नवी दिल्ली: देशभरात जिथं मॅगीच्या नावानं हा:हाकार माजलाय. तिथं काही दिवसांपासून सोशल मीडियावर योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली मॅगी आल्याचा फोटो वायरल होतोय. मात्र या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे.
सोशल मीडियावर एका जोकच्या रुपात ट्रेंड होत असलेली पतंजली मॅगीची बाब आता सत्यात उतरणार आहे. बाबा रामदेव यांनी आपण स्वदेशी नूडल्य तयार करणार असल्याचं सांगितलंय.
मात्र यापूर्वी आपण कोणत्याही प्रकारची मॅगी बनवली नसून जो फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय. तो म्हणजे पतंजली बिस्कीटचा फोटो आहे. जो की फोटोशॉपवर एडिट करून कुणी तरी फिरवलाय, असं स्वत: बाबा रामदेव यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय.
मात्र स्वदेशी नूडल्स आणि बोर्नव्हिटा, हॉर्लेक्सच्या धर्तीवर पावरविटा आणणार असल्याचंही बाबा रामदेव यांनी सांगितलं.
The photoshoped picture floating in social media is actually Patanjali Namkeen Biscuit. http://t.co/aLi3XbhfRQ (2/2) pic.twitter.com/otuLX305yM
— Swami Ramdev (@yogrishiramdev) June 6, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.