खुशखबर! आता एका क्लिकवर मिळणार ट्रेनची माहिती..

रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम (क्रिस)नं रेल्वेच्या माहितीसाठी एक नवी वेबसाईट लॉन्च केली आहे. www.trainenquiry.com ही ती वेबसाईट आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या नव्या वेबसाईटचा वापर खूप सोपा आहे. त्याचबरोबर या वेबसाईटची स्पीडदेखील जलद आहे.

Updated: Nov 23, 2014, 04:21 PM IST
खुशखबर! आता एका क्लिकवर मिळणार ट्रेनची माहिती.. title=

पाटणा : रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम (क्रिस)नं रेल्वेच्या माहितीसाठी एक नवी वेबसाईट लॉन्च केली आहे. www.trainenquiry.com ही ती वेबसाईट आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या नव्या वेबसाईटचा वापर खूप सोपा आहे. त्याचबरोबर या वेबसाईटची स्पीडदेखील जलद आहे.

ही वेबसाईट इंग्लिश तसंच हिंदी भाषेत उपलब्ध आहे. शुक्रवारी २१ नोव्हेंबरला ही वेबसाईट लॉन्च करण्यात आलीय.

या वेबसाईटची खासियत -

स्पॉट योर ट्रेन : यामुळं ट्रेनचं शेड्युल, रनिंग टाईम कळेल

स्टेशन : कोणत्याही स्टेशनवरून पुढच्या २-४ तासांच्या ट्रेनचं टाईमिंग कळण्यास मदत होईल.

ट्रेन्स बिटविन स्टेशन्स : भारतीय रेलवे द्वारा चालणाऱ्या ट्रेनच्या दोन स्टेशन्सदरम्यानची स्थिती कळण्यास मदत होईल.

कॅन्सल ट्रेन्स : यामुळं रद्द झालेल्या ट्रेनची माहिती कळणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.