बाबा रामपालचा किडनी विक्रीचा व्यवसाय

बाबा रामपालनं हिस्सारमध्ये आपलं प्रस्थ वाढवलं असलं तरी आसपासच्या गावात मात्र बाबाबद्दल असंतोषाचं वातावरण आहे. दरम्यान, तो किडनी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले आहे.

Updated: Nov 23, 2014, 10:01 AM IST
बाबा रामपालचा किडनी विक्रीचा व्यवसाय title=

हिस्सार : बाबा रामपालनं हिस्सारमध्ये आपलं प्रस्थ वाढवलं असलं तरी आसपासच्या गावात मात्र बाबाबद्दल असंतोषाचं वातावरण आहे. दरम्यान, तो किडनी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पुढे आले आहे.

नेत्यांशी मैत्री असलेल्या बाबानं याच परिसरात 52 एकर जमीन खरेदी केल्याचा दावा गावक-यांनी केलाय. हॉस्पिटलच्या नावाखाली बाबा किडनी विक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप गावक-यांनी केलाय. रामपालच्या आश्रमात निरोधची पाकीटे, महिला प्रसाधन गृहात छुपे कॅमेरे बसविल्याचे पुढे आले होते. तर नक्षलवाद्यांना आसरा दिल्याचा आरोपही बाबा रामपालवर करण्यात आलाय.

खून प्रकरणातला आरोपी 
एका खून प्रकरणात हरयाणातले संत रामपाल यांच्याविरुद्ध पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं आजामीनपात्र वॉरंट जारी केलाय. त्या आदेशानुसार, रामपाल यांना कोर्टापुढं हजर करण्यासाठी पोलीस पथक हिस्सार इथल्या रामपालांच्या बरवाला आश्रमात गेलं असता, रामपाल सर्मथकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. यामुळे निर्माण झालेल्या चकमकीमध्ये काही जणांना आपला जीव गमवावा लागलाय. आत्तापर्यंत आश्रामातून हजारोंच्या संख्येने नागरिकांना बाहेर काढण्यात आल असून चाळीसहून अधिक मिलिट्री फोर्स आणि पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 

रामपालच्या समर्थकांचा हिंसाचार...
१२ जुलै २००६ मध्ये रोहतकमधील आश्रमाबाहेर दोन गटांमध्ये हिसांचार झाला त्यामध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. गोळीबार रामपाल यांच्या आश्रमातून झाल्याचा आरोप मृत व्यक्तिच्या भावाने केला. याप्रकरणी बाबा रामपालसह ३७ समर्थकांविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर स्थानिकांनी रामपाल यांच्या करौथातील आश्रमाला विरोध केला. १२ मे २०१३ रोजी आश्रमात तिघांचा मृत्यू झाला यानंतर १४ मे २०१३ रोजी आश्रम खाली करण्यात आला. याप्रकरणी रामपाल हे अनेकदा सुनावणीला हजरच न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता आजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी हिंसाचार सुरु केलाय.

इंजिनिअर ते जगतगुरु...
रामपाल यांचा १९५१ मध्ये धनानामध्ये जन्म झाला. इंजिनिअरचं शिक्षण घेतलेल्या रामपाल यांनी २००० मध्ये सिंचन विभागातील नोकरी सोडून कबीरपंथ अवलंबला. आपल्या वेबसाईटवर स्वत:ला जगतगुरु अशी उपाधी देणा-या रामपाल यांनी २००६ मध्ये महर्षी दयानंद यांच्याबाबात साईटवर वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या कथित टिप्पणीनंतर रामपाल समर्थक आणि आर्य समाजात वाद निर्माण झाला त्यातूनच एकाचा खून झाल्याने हे प्रकरण पुढे चिघळत गेल. दरम्यान रामपाल यांनी हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि सनातन धर्माशी संबंधित गोष्टींवर सवाल उपस्थित केल्याने चांगलात वाद निर्माण झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.