लष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय. 

Updated: Dec 8, 2016, 11:57 AM IST
लष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू  title=

अनंतनाग : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय. 

अनंतनागमध्ये अबु दुजाना लपून बसल्याची खबर लष्कराला मिळाली होती. यानंतर सेनेनं सर्च ऑपरेशन सुरू करत त्याला घेरलंय. दहशतवादी आणि सेनेत चकमक सुरू आहे. 

काश्मीरमध्ये एका चकमकीत लष्कर कमांडर अबु कासिम याला सेनेनं ठार केल्यानंतर अबु दुजाना याला लष्कर-ए-तय्यबाचा टॉप कमांडर बनवण्यात आलंय.
अबु दुजाना याच्यावर १२.५० लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलंय.