नवी दिल्ली : वाराणसीमधील आर्यन इंटरनेशनल हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांनी जिओ सिमचा वापर करुन डिजिटल लॉक बनवला आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरचा लॉकर किंवा तिजोरी सुरक्षित करु शकतात.
अतुल, प्रियांशु आणि उज्ज्वल यांनी म्हटलं की, त्यांनी खराब जिओ सिमचा वापर करुन हे लॉक बनवलं यामध्ये इंटरनेटचा कोणताही वापर नाही करावा लागत. जसं हॉटेलमध्ये रुमच्या दाराचं चावी टाकून लॉक उघडतास लाईट पेटते तसंच सिमचं कोडींग बदलून त्याचा डिवाइसचा वापर म्हणून वापर केला.
डिजिटल लॉक बाजारमध्ये आहेत पण ते खूप महाग आहेत. पण हा लॉक खूर स्वस्त आहे. सिम स्लॉट डिवाइसमध्ये फक्त सिमला टच करुन तुम्ही तुमच्या घराचा लॉक उघडू शकता आणि परत टच केलं की लॉक करु शकता.
खराब झालेले 4 सिम आणि गेअर सर्किट, सिम स्लॉट आणि बॅटरीच्या माध्यमातून हे डिजिटल लॉक बनवलं आहे.
- केवळ 7 दिवसात हे डिजिटल लॉक बनवण्यात आलं आहे.
- 29 व्हॉल्टची बॅटरी वापरण्यात आली आहे. जी जवळपास 30 रुपयांपर्यंत मिळते.
- एक गेअर पुली - 30 रुपये
- सिम स्लॉट - 10 रुपये
- बॅटरी सॉकेट - 10 रुपये
- बॅटरी लाइट - 5 रुपये
- खराब सिम