नवी दिल्ली : रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आज रेल्वे बजेट सादर केलंय. आतापर्यंत भारत सरकारनं वेळोवेळी प्रवाशांच्या सुविधांवर लक्ष ठेवलं आहे. मात्र तरी देखील इंडियन रेल्वेसाठी लोकांची अनेक तक्रारी असतात. सर्वात मोठी समस्या असते ते प्रवास सुरु करण्यापूर्वी ट्रेनचा मार्ग आणि रिझर्व्हेशन करणं...
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं एप्रिलमध्ये CRIS (सेंटर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम)च्या अंतर्गत एक अॅप लॉन्च केलंय. जे 'विंडोज 7' प्लॅटफॉर्मवर काम करतं. हे अॅप ट्रेन संबंधित माहितीपासून रिझर्व्हेशनपर्यंतची सगळी माहिती देतं. यासोबत अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी काही अॅप उपलब्ध आहेत. जे युजर्संना रेल्वेच्या संबंधित सुविधा देतात.
पाच मोफत ट्रेन अॅपस
1. IRCTC (Indian Railway)
अॅन्ड्रॉईड डेव्हलपर लिमिटेड द्वारे बनवलं गेलेलं हे अॅप रेल्वेचा मार्ग, वेळापत्रक, ई- तिकिटांची माहिती, रिझर्व्हेशन, तिकीट रद्द करणं अशा नेहमी उपयोगी असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देतं. हे फ्री अॅप असून गूगल प्ले स्टोअर्सवर उपलब्ध आहे. या अॅपसोबत IRCTC अधिकृत वेबसाईटचा ही यूजर्स वापर करु शकतात. याचा वापर करण्यासाठी IRCTCच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डची गरज लागते.
गूगल प्लेवर असलेलं हे अॅप 10,000 पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केलंय.
2. Indian Rail Enquiry
हे अॅप ई-फिनाइट (E-finite)व्दारे बनवलं गेलंय. या फ्री अॅपव्दारे यूजर्स PNR स्टेटसपासून ट्रेनचे स्टेटस, ट्रेन शेड्यूल, IRCTC व्दारे तिकीट बुकींग सुविधा, सीट स्टेटस, ऑफलाईन PNR स्टेटस तपासणे, दोन स्टेशन मधल्या ट्रेन्सची माहिती मिळवणे या सर्व गोष्टीची माहिती मिळवू शकतात. तिकीटांचे भाडे किती असेल हे देखील समजते.
आतापर्यंत 14,897 लोकांना या अॅपला रेटींग केले आहे. त्यामध्ये लोकांनी 5 पैकी 4.2 स्टार दिले आहेत. तसंच 500,000 पेक्षा जास्त लोकांनी याला डाऊनलोड केलंय.
3. IRCTC PNR Rail and Train Enquiry
PNR आणि ट्रेन स्टेटस चौकशीसाठी असलेला अजून एक अॅप आहे. हा अॅपमुळं PNR स्टेटस, ट्रेनची चौकशी, ट्रेनचं वेळापत्रक अशा प्राथमिक सुविधांसोबत अन्य काही फिचर्सही दिले गेले आहेत. गूगल प्लेच्या लिस्टिंगनुसार, या अॅपव्दारे तुम्ही MEra सर्व्हिसचा उपयोग करु शकता म्हणजेच प्रवाशांना ट्रेनच्या बर्थवर खाण्याची ऑर्डर मागविण्यासाठी बनवली गेलेली ही सुविधा आहे.
याच्याव्यतिरीक्त हे अॅप लाईव्ह ट्रेनचंही स्टेटस देउ शकतं. अॅपच्या मदतीनं स्टेशन अलार्म लावू शकतो. ज्याने स्टेशन येण्याआधी काही वेळेपूर्वी चेतावनी देतं.
हा अॅपला 15,885 लोकांनी रेटींग दिले आहेत त्यामध्ये 5 पैकी 4.3 स्टार दिले आहेत. गूगल प्लेवर हा अॅप डाऊनलोडर करणाऱ्यांची संख्या 500,000 पेक्षा जास्त आहे.
4. Indian Railway Guide
क्विक प्रोग्रॅमर सॉफ्टवेयर्स व्दारे बनवल्या गेलेल्या हा अॅपला गूगल प्लेवर फ्री डाऊनलोड केलं जातं. यात असे काही फिचर्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत किंवा कामाचे आहेत.
ट्रेनची वेळ, ट्रेन वेळापत्रक, स्टेटस, PNR स्टेटस, ट्रेनच्या भाड्याची माहिती, ट्रेनच्या सीट स्टेटस अशा प्राथमिक गरजा पूर्ण होतात.
गूगल प्लेवर 3,613 लोकांनी रेटिंग दिली आहे. त्यात लोकांनी 5 पैकी 4.4 स्टार दिले आहेत. गूगल प्ले वर हे अॅप डाऊनलोड करणाऱ्याची संख्या 100,000 पेक्षा जास्त आहे.
5 Indian Rail Train & IRCTC Info
सगळ्या अॅपप्रमाणे हे ही अॅप गूगल प्लेहून डाऊनलोड करु शकतो. ट्रेन स्टेटस, ट्रेनचे भाडे, PNR स्टेटस, PNR स्टेटस शेअरिंग सोबत ट्रेन तिकिट बुकींग अशा सामान्य गरजा उपलब्ध आहेत.
90,003 लोकांनी या अॅपला रेटींग दिले आहे. त्यात 5 पैकी 4.3 स्टार दिले आहेत. वरील सर्व अॅप पेक्षा जास्त लोकांनी याला डाऊनलोड केलंय.
गूगल प्लेच्या आकड्यानुसार 1,000,000 पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.