नवी दिल्ली : रेल्वे बजेटच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यावेळी काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांनी गौडा यांच्या नावाची पाटी तोडली आणि पायाखाली तुडवली.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. रेल्वेमंत्र्यांच्या घरावरील या हल्ल्याचा निषेध केला जातोय.
सुरुवातील सदानंद गौडा यांच्या गाडीवर चढाई केली. गौडा यांच्या वाहनावर चढून शर्मा आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवला.
काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेकदा विरोधकांच्या विरोधाच्या पद्धतीवर त्यांच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केली. पण आता मुकेश शर्मा यांच्या या विक्षिप्त पद्धतीनंतर काँग्रेस नेत्यांनाच आता लोकशाही पद्धतीनं कसा विरोध करतात ते शिकवण्याची गरज असल्याचं चित्र आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.