मुंबई : नोटबंदीनंतर नेस्ले कंपनीचं 100 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि एमडी सुरेश नारायण यांनी हे वक्तव्य केलं आहे. नोटबंदीनंतर नेस्लेच्या नफ्यामध्ये 8.66 टक्के घट झाली आहे. नोटबंदीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाजही नारायण यांनी व्यक्त केला आहे.
चांगला पाऊस, सातवा वेतन आयोग आणि आयकर मर्यादा वाढवल्यामुळे एफएमसीजी प्रॉडक्ट्सच्या विक्रीमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षाही नारायण यांनी व्यक्त केली आहे.