www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी लोकसभेत काल प्रमाणे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी बसले नाही. पण ते पुढील रांगेत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह आणि राम विलास पासवान यांच्या शेजारी बसले होते. मोदींच्या शेजारी आज राजनाथ सिंह बसलेले दिसले.
वास्तविक अडवाणी यांनी संसदीय कार्य मंत्री वैकय्या नायडू यांना दुसऱ्या रांगेत बसण्याची परवानगी मागितली होती. पण वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा आग्रह करण्यात आला. काल पंतप्रधान मोदी आणि अडवाणी सत्ताधारी बाकांवर पहिल्या रांगेत बसलेले आपल्या दिसले होते.
मोदींच्या नेतृत्त्वाखालील नव्या सरकारमध्ये अडवाणीचा समावेश करण्यात आलेला नाही. पण परंपरेच्या विपरीत ते पंतप्रधानासह पहिल्या रांगेत बसले होते. साधारणतः मंत्रीमंडळातील सदस्यच पहिल्या रांगेत पंतप्रधानांसह बसतात.
दुसरीकडे राहुल गांधी विरोध पक्षांच्या बाकांवर अखेरच्या रांगेत बसलेले दिसले. त्यांनी त्या ठिकाणी बसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेशी बराच वेळ चर्चा केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.