बंगळुरु : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाटककार आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. कुलबर्गीप्रमाणे तुमचे हाल होतील, असे धमकविण्यात आले आहे. कलबुर्गी यांची ऑगस्टमध्ये हत्या करण्यात आली होती.
अधिक वाचा : 'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'
चंद्रा नावाच्या एका अज्ञाताने ही धमकी दिली आहे. याबाबत ट्विट करण्यात आलेय. दरम्यान ट्विटरवर धमकी दिल्यानंतर हे ट्विट काढून टाकण्यात आले आहे. बुधवारी कर्नाड यांनी बंगळुरु येथे एक वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली आहे.
माझ्या विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे कर्नाड यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. दरम्यान, कर्नाड यांच्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शने करुन आपला विरोध दर्शविला. कर्नाड यांनी टिपू सुल्तान हे हिंदू असते तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांना दर्जा मिळाला असता असे म्हटले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.