भारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी!

Updated: Sep 10, 2014, 12:45 PM IST
भारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी! title=

 

नवी दिल्ली : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.

मॅन पॉवर एंप्लॉयमेंट आउटलुक सेवेच्या मते आज भारतीय नोकऱ्यांमध्ये पुढील तीन महिन्यांच्या काळात नियुक्ती होतील, असं म्हटलं जात आहे. कर्मचाऱ्यांची संख्या ही चाळीस टक्क्यांनी वाढविण्याचा त्यांचा विचार सुरू आहे.

जागतिक स्तरावर नियुक्तीसाठी भारत हा चौथ्या क्रमांकावर असून तालिबान आणि न्यूझीलंड हे देश देखील नियुक्तीच्या बाबतीत मजबूत आहेत. तर स्पेन, इटली, आयरलँड आणि फिनलँड चेक गणराज्य देश नियुक्तीमध्ये जगात कमकुवत आहेत.

देशात नवीन सरकार झाल्याचा प्रभाव नोकऱ्यांमध्ये देखील दिसून येत आहे. त्यामुळे  नियुक्ती झालेल्यांची पुन्हा एकदा त्यांची नियुक्ती करण्याची तयारी होत आहे, असं मॅन पावर ग्रुप इंडिया यांचे प्रबंध निदेशक ए. जी. राव यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.