नवी दिल्ली : सत्संगमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून तिला आपल्या जाळ्यात फसवणाऱ्या दोन तरुणांविरोधात पोलिसात एका तरुणीने तक्रार नोंदवली आहे.
एका तरुणाने तो खूप मोठ्या घरातला असून पीडितेसोबत लग्न करण्याचं आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने याला विरोध केल्यानंतर तिचे काही अपमानास्पद फोटो इंटरनेटवर टाकण्याचे आणि तिच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडितेने पोलिसात केली आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपी अशोक याला अटक केली असून त्याला कोर्टात लवकरच त्याला कोर्टात नेण्यात येणार आहे. त्यानंतर कोर्टाकडून त्याची पोलीस कोठडीची मागणी करून त्याची चौकशी केली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.