पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. ५० विधानसभा क्षेत्रातील सुमारे दीड कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८०८ उमेदवारांचं भवितव्य आज मतदार राजा ठरणार आहे.
बिहारमधील सहा जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया पार पडतेय. सारण, वैशाली, नालंदा, पटना, भोजपूर आणि बक्सर या जिल्ह्यांमध्ये मतदान होतंय. मुख्यमंत्री नितीशकुमार, आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक महत्वाची आहे. नितीशकुमार यांच्या नालंदामध्ये आज मतदान होतंय. तर लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं तेजस्वी आणि तेजप्रताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आणखी वाचा - बिहार निवडणूक: पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान
तेजस्वी राघोपूर तर तेजप्रसाद महुआ इथून निवडणूक लढवतायेत. त्याचंही राजकीय भविष्य आज ठरणार आहे. दरम्यान प्रशासनानं मतदान केंद्राभोवती चोख बंदोबस्त ठेवला आहे. हेलिकॉप्टरमधून लक्ष ठेवलं जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.