जम्मू-काश्मीर : भारतीय लष्करी तळावर नागरोटामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात दोन जवान शहीद झालेत. दरम्यान, जवानाने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले. अतिरेकी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरुच आहे.
दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी जवानांने जोरदार प्रत्यूत्तर दिले. नागरोटामध्ये गोळीबार अजून सुरू असून परिस्थिती नियंत्रणात, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मनिष मेहता यांनी दिली.
याशिवाय दहशतवाद्यांकडून परिसरात बॉम्बहल्लादेखील करण्यात आला आहे. या भागात दहशतवादी घुसल्याने प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पहाटे ५.३० च्या सुमारास दहशतवाद्यांनी नागरोटातील जवानांच्या तुकडीवर हल्ला केला. यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्तुत्तर देण्यास सुरुवात केली.
मात्र दहशतवाद्यांची संख्या ३ ते ४ असण्याची आहे. याशिवाय सांबामधील चमियालजवळील लष्काराच्या चौकीजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. यानंतर सीमा सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. यानंतर पंपहाऊस भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.