श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या हंदवाडा सेक्टरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला.
पहाटेच्या सुमारास 30 राष्ट्रीय रायफलच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 15 मिनिटं दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता.
पण प्रत्त्युतरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी धूम ठोकलीय. जवानांनी संपूर्ण परिसर घेरला असून कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे