धक्कादायक: इंजीनिअरनं यूट्यूबवर टाकला पत्नीचा अश्लील व्हिडिओ

पोलिसांच्या सेंट्रल क्राइम स्टेशननं दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसमध्ये काम करण्याऱ्या इंजीनिअरला अश्लील व्हिडिओ टाकल्याच्या आरोपात अटक केलीय. इंजीनिअर ई. मुरली कृष्णला वेगळी राहत असलेल्या त्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्याच्या आरोपात पोलिसांनी पकडलं. त्याला दोन मुलंही आहेत.

Updated: Oct 28, 2015, 11:43 AM IST
धक्कादायक: इंजीनिअरनं यूट्यूबवर टाकला पत्नीचा अश्लील व्हिडिओ title=

हैदराबाद: पोलिसांच्या सेंट्रल क्राइम स्टेशननं दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसमध्ये काम करण्याऱ्या इंजीनिअरला अश्लील व्हिडिओ टाकल्याच्या आरोपात अटक केलीय. इंजीनिअर ई. मुरली कृष्णला वेगळी राहत असलेल्या त्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्याच्या आरोपात पोलिसांनी पकडलं. त्याला दोन मुलंही आहेत.

आणखी वाचा - सेक्स रॅकेटचा भांडाफोड; अश्लील सामान जप्त

२५ जानेवारी २०१०ला मुरली कृष्णनं आपल्या नात्यातीलच भाग्यलक्ष्मी या महिलेसोबत लग्न केलं. ती सुद्धा इंफोसिसमध्ये नोकरी करते. भाग्यलक्ष्मीचे भाऊ गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची बहिण गर्भवती होती आणि कुटुंबाच्या दबावामुळे मुरली कृष्णनं तिच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या वेळी आम्ही १० लाख रोख आणि २० लाखांचे दागिने हुंडा म्हणून मुलाकडच्यांना दिले होते. मात्र काही दिवसांनंतर भाग्यलक्ष्मीचा हुंड्यासाठी छळ केला जावू लागला. 

आणखी वाचा - लज्जास्पद : प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये कंडक्टरने महिलाला निर्वस्त्र करून घेतली झडती

पाणी डोक्यावरून जात असल्यानं सहन न झाल्यानं अखेर नोव्हेंबर २०१४मध्ये मलाकपेट पोलीस स्टेशनमध्ये भाग्यलक्ष्मीनं तक्रार केली. गिरी म्हणाले, 'तक्रार केल्यानं चिडलेल्या मुरली कृष्णनं यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात लग्नाचे फोटोही होते. या व्हिडिओमध्ये माझ्या बहिणीला वेश्या म्हटलं गेलं आणि तिचा मोबाईल नंबर दिला. नंतर जगभरातून माझ्या बहिणीला अश्लील फोन येवू लागले. यानंतर आम्ही सेंट्रल क्राइम स्टेशनला तक्रार दाखल केली.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.