छोटा राजन 'महादलित', दाऊदला पकडणं गरजेचं - आठवले

'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले खासदार रामदास आठवले यांनी गँगस्टर छोटा राजनचा उल्लेख 'महादलित' असा केलाय. 

Updated: Oct 28, 2015, 11:34 AM IST
छोटा राजन 'महादलित', दाऊदला पकडणं गरजेचं - आठवले title=

पाटणा : 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले खासदार रामदास आठवले यांनी गँगस्टर छोटा राजनचा उल्लेख 'महादलित' असा केलाय. 

आठवले सध्या बिहारच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेत. ते दरभंगामध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दाखल झाले होते. 

अधिक वाचा - मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक

'छोटा राजन हा 'महादलित' आहे... सगळ्यात मोठा आरोपी म्हणजे दाऊद इब्राहिम... त्याला पकडणं गरजेचं आहे...' अस वक्तव्य यावेळी आठवले यांनी केलंय. 

छोटा राजनच्या माध्यमातून कदाचित भारत सरकार दाऊद इब्राहिमपर्यंत पोहचू शकेल... ज्या पद्धतीनं अमेरिकेनं लादेनला पकडलं त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊलदला भारतानं पकडावं... असा सल्लाही त्यांनी यावेळी भारत सरकारला दिलाय. 

अधिक वाचा - छोटा राजनला झाली अटक पण तो हसतोय...
  
भारत सरकारनं रविवारी २५ ऑक्टोबर रोजी राजेंद्र सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजनला इंडोनेशियाच्या बालीमधून अटक केलीय.

उल्लेखनीय म्हणजे, आरपीआयनं २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा भाऊ दीपक निखाळजे याला चेंबूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. आरपीआयचा उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या दीपक निकाळजेची सध्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.