24 वर्षांची नोकरी... 23 वर्ष गैरहजेरी!

मध्यप्रदेशातल्या एका शिक्षिकेनं गैरहजर राहण्याचे सगळे रेकॉर्ड तोडलेत... ही शिक्षिका आपल्या आत्तापर्यंतच्या 24 सेवाकाळात तब्बल 23 वर्ष गैरहजर राहिलीय.  

Updated: Aug 6, 2014, 11:18 AM IST
24 वर्षांची नोकरी... 23 वर्ष गैरहजेरी!  title=
प्रातिनिधिक फोटो

इंदोर : मध्यप्रदेशातल्या एका शिक्षिकेनं गैरहजर राहण्याचे सगळे रेकॉर्ड तोडलेत... ही शिक्षिका आपल्या आत्तापर्यंतच्या 24 सेवाकाळात तब्बल 23 वर्ष गैरहजर राहिलीय.  

सरकारी शाळांत शिक्षक गैरहजर राहणं ही शुल्लक गोष्ट समजली जाते. पण, मध्यप्रदेशातल्या एका शाळेतील एका 46 वर्षीय शिक्षिकेनं हे सगळे रेकॉर्ड तोडलेत. ‘शासकीय अहिल्या आश्रम विद्यालय क्रमांक- 1’ या शाळेत ही शिक्षिका दाखल झाली होती. या शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा वैद्य यांनी दिलेल्य माहितीनुसार, या शाळेत शिकवणाऱ्या संगीता कश्यप यांनी आपल्या 24 वर्षांच्या सेवाकाळातील 23 वर्ष सुट्टी आणि अनुपस्थितीत घालवलेत. 

संगीता कश्यप यांनी 1990 मध्ये देवासच्या शासकीय महाराणी राधाबाई कन्या उच्च माध्यमिक विद्यालयापासून आपल्या नोकरीला प्रारंभ केला होता. 1991 ते 1994 पर्यंत त्या सुट्टीवर होत्या. त्यानंतर 1994 मध्ये इंदोरच्या शासकीय अहिल्या आश्रमात त्यांची बदली झाली. या वर्षी संगीता गर्भवती होत्या. त्यांनी तेव्हापासून घेतलेली सुट्टी आत्तापर्यंत संपलेली नाही.  

मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याच शाळेतील रचना दुबे (42) ही शिक्षिकाही गेल्या अनेक काळापासून गायब आहे. रचनानं 10 वर्षांपूर्वी पीएचडीसाठी वेळ घेतला होता. यावेळी, त्यांनी जी सुट्टी घेतलीय ती आत्तापर्यंत... 

या दोघींना अनेकदा पत्र धाडले गेले मात्र हे पत्र पुन्हा शाळेकडे परत आल्याचं मुख्याध्यापक वैद्य सांगतात. या दोन्ही शिक्षिकेच्या अनुपस्थितीविषयी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना माहिती कळवली गेलीय. त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.