मुंबई : देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी 'टीसीएस'नं यंदाच्या वित्तीय वर्षात तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांची नवीन भरती करणार आहे. ही माहिती मंगळवारी कंपनीकड़ून देण्यात आलीय.
तसंच वेगवेगळ्या डिजीटल टेक्नॉलॉजीमध्ये सध्या कार्यररत असणाऱ्या जवळपास एक लाख कर्मचाऱ्यांना कंपनीकडून प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.
'टीसीएस' या सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या कंपनीचा यंदाच्या वर्षात 'डिजीटल' क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचा विचार आहे.
टीसीएसचे अध्यक्ष सायरस मिस्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी या आर्थिक वर्षात एकूण ६०,००० लोकांची भरती करणार आहे. कंपनीनं गेल्या आर्थिक वर्षात ६७,००० लोकांना आपल्यात सामाविष्ट करून घेतलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.