2 लाखापेक्षा अधिक सोनं खरेदीवर लागणार टॅक्स

एक एप्रिलपासून दोन लाख रुपयापेक्षा अधिकचं सोनं खरेदी केल्यास त्यावर आता एक टक्के टीसीएस (टॅक्स डिडक्शन सोर्स) द्यावा लागणार आहे. आतापर्यंत 5 लाखांच्या सोनं खरेदीवरहा टॅक्स द्यावा लागत होता. अर्थ विधेयक 2017 मंजुर झाल्यानंतर 2 लाखांच्या दागिन्यांवर एक टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे.

Updated: Feb 20, 2017, 01:14 PM IST
2 लाखापेक्षा अधिक सोनं खरेदीवर लागणार टॅक्स title=

नवी दिल्ली : एक एप्रिलपासून दोन लाख रुपयापेक्षा अधिकचं सोनं खरेदी केल्यास त्यावर आता एक टक्के टीसीएस (टॅक्स डिडक्शन सोर्स) द्यावा लागणार आहे. आतापर्यंत 5 लाखांच्या सोनं खरेदीवरहा टॅक्स द्यावा लागत होता. अर्थ विधेयक 2017 मंजुर झाल्यानंतर 2 लाखांच्या दागिन्यांवर एक टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे.

या विधेयकात 5 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या दागिन्यांवर लागणारा टॅक्सची मर्यादा आता 2 लाख करण्यात आली आहे. या विधेयकात तसेच 3 लाखापेक्षा अधिकच्या रोख व्यवहारांवर देखील बंदी घालण्यात आली. या नियमाचं उल्लंघन केल्यास पैसे स्वीकारणाऱ्यावर कारवाई होणार आहे.

दागिन्यांच्या खरेदीवर विशेष असा काही नियम नाही तयार केलं गेला आहे. सामान्य वस्तूंच्या उत्पादनात याचा समावेश केला गेला आहे. या वस्तुंवर एका वेळी 2 लाखाहून अधिकच्या खरेदीवर 1 टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे.

मोठी खरेदी करुन काळापैसा दडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.