पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं

पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं आहे. काश्मीर प्रश्न हा तिथल्या लोकांच्या भावनेनुसार सुटायला हवा, अशी मुक्ताफळं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी उधळलीयेत. उच्चायुक्तालयात पाकिस्तान दिनानिमित्त मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: Mar 24, 2017, 08:45 AM IST
पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं title=

नवी दिल्ली : पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं आहे. काश्मीर प्रश्न हा तिथल्या लोकांच्या भावनेनुसार सुटायला हवा, अशी मुक्ताफळं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी उधळलीयेत. उच्चायुक्तालयात पाकिस्तान दिनानिमित्त मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.

काश्मीरींचा संघर्ष दाबला जाऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी फुटिरतावाद्यांची भलामण केली. याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये पाकिस्ताननं ढवळाढवळ करू नये, असं मुळचे काश्मीरी असलेले पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी सुनावलं आहे. उलट पाकिस्ताननं गिळंकृत केलेला पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टिस्तान परत करावा, असं सिंग म्हणाले.