आग्रा : 'चमत्कारी औषध' घेण्यासाठी लोकांची झुंबड

आग्रातील ककरैठा गावात अंधविश्वासाचा एका मेळा भरला आहे. आपले बिघडलेले काम करण्यासाठी एका २९ वर्षाच्या बाबाकडून एक 'चमत्कारी काढा' पिण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. 

Updated: Oct 5, 2015, 09:43 PM IST
आग्रा : 'चमत्कारी औषध' घेण्यासाठी लोकांची झुंबड title=

आग्रा : आग्रातील ककरैठा गावात अंधविश्वासाचा एका मेळा भरला आहे. आपले बिघडलेले काम करण्यासाठी एका २९ वर्षाच्या बाबाकडून एक 'चमत्कारी काढा' पिण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. 

बाबाला रुग्णांच्या आजाराबद्दल माहित आहे, न आपल्या जडीबुटीचा साईड इफेक्ट, न त्याच्याकडे मेडिकल प्रॅक्टीस करण्याची कोणतीही डिग्री किंवा डिप्लोमा नाही. पण तरी देखील औषध घेण्यासाठी दररोज २० ते २५ हजार लोग या ठिकाणी येत आहे. सोमवारी तर एक लाख जण या ठिकाणी असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

गाजीपूर येथील शिवशक्ती बाबा भुडकनाथ याचे खरे नाव मनोज सिंह यादव आहे. त्याचे शिष्य सांगतात की त्यांनी इंटरमिजिएटनंतर आयटीआय केल आहे, त्यानंतर ते शिवभक्त झाले आणि नंतर बाबा भुडकनाथ झाले. सात दिवसापासून ककरैठा येथे एक शिबीर सुरू केले आहे. सुरूवातीच्या सहा दिवस ते कोणाशी बोलले नाही. रविवारी मीडिया आल्यावर मौन सोडले आहे. 

बाबाच्या शिबीरात आलेले लोक त्यांची माऊथ टू माऊथ पब्लिसिटी करत आहेत. बाबांच्या हातून २१ दिवस औषध घेतल्या सर्व आजार दूर राहतात. मग काय लागली रुग्णांची लांबच लांब रांग... बाबाकडे ५०० गाय, तीन घोडे आणि तीन कुत्रे आहेत. बाबा आपल्या हाताने भोलेबाबाचा प्रसाद सांगून दोन-दोन घोट दूध पाजत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.