अभी क्यूं चिल्ला रहे हो, कल गए थे बचाने किसान को!- सुमित्रा महाजन

आम आदमी पार्टीच्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या दौसामधील शेतकरी गजेंद्र सिंहच्या मुद्द्यावर लोकसभेत चांगलीच चर्चा झाली.  

Updated: Apr 23, 2015, 03:16 PM IST
अभी क्यूं चिल्ला रहे हो, कल गए थे बचाने किसान को!- सुमित्रा महाजन title=

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या रॅलीत आत्महत्या करणाऱ्या दौसामधील शेतकरी गजेंद्र सिंहच्या मुद्द्यावर लोकसभेत चांगलीच चर्चा झाली. लोकसभेच्या कामकाजाची सुरूवात होताच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्नकाळ स्थगित करून शेतकरी गजेंद्र सिंहच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. यावर सरकार चर्चेस तयार असल्याचं संसदीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. 

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी चर्चेसाठी 12 वाजताची वेळ दिली. मात्र विरोधी पक्ष वारंवार घोषणाबाजी करत होते, ‘होश में आओ, होश में आओ.’ त्यानंतर वैतागून अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना सवाल केला की, ‘अभी क्यूं चिल्ला रहे हो, कल गए थे बचाने उस किसान को.’

विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांच्या बोलण्याकडे लक्ष न देता घोषणाबाजी सुरू ठेवली. सदस्यांच्या गदारोळावर राग व्यक्त करत अध्यक्ष सुमित्रा महाजन पुन्हा बोलल्या की, ‘किसी को भी गरीब किसान की फिक्र नहीं है. सब अपनी राजनीति करने में लगे हुए है.’

त्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्र्यासोबत या विषयावर चर्चा केली. या चर्चेत अरुण जेटली, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, व्यंकय्या नायडू उपस्थित होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.