दौसामध्ये गजेंद्र सिंहवर अंत्यसंस्कार, दिल्लीत आंदोलन

आम आदमी पार्टीच्या बुधवारी झालेल्या रॅलीत आत्महत्या केलेल्या, शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर राजस्थानमधील नांगल झमरवाडा येथे अंत्य संस्कार करण्यात आले आहे.  

Updated: Apr 23, 2015, 04:29 PM IST
दौसामध्ये गजेंद्र सिंहवर अंत्यसंस्कार, दिल्लीत आंदोलन title=

नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या बुधवारी झालेल्या रॅलीत आत्महत्या केलेल्या शेतकरी गजेंद्र सिंह यांच्या पार्थिवावर राजस्थानमधील नांगल झमरवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट, अशोक गहलोद आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मृत गजेंद्रच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. दुसरीकडे दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आप सरकारविरोधात प्रदर्शन करत आहेत.

गजेंद्रच्या कुटुंबियांनी गजेंद्रच्या आत्महत्येसाठी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना जबाबदार ठरवलं आहे. पत्रकारांनाही कुटुंबियांशी भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. 

गजेंद्रने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहीले आहे की, मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतातील पिकाचं बरचं नूकसान झालं होतं. मात्र स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी शेतीचं नूकसान फक्त 20-25 टक्के दाखवलं होतं. ही आकडेवारी राजस्थानातील दुसऱ्या भागांपेक्षा खूप कमी होती.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.