'मनी लाँड्रिंगप्रकरणी राजन यांची चौकशी व्हावी'

मनी लाँड्रिंगप्रकरणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय.

Updated: Jun 16, 2016, 03:56 PM IST
'मनी लाँड्रिंगप्रकरणी राजन यांची चौकशी व्हावी' title=

मुंबई : मनी लाँड्रिंगप्रकरणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलीय.

'एसआयटी'मार्फत ही चौकशी करण्यात यावी अशी स्वामींची मागणी आहे. त्या संदर्भात स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलंय. 

स्वामींच्या रडारवर राजन?

सुब्रम्हण्यम स्वामी यांनी राजन यांना टार्गेट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा त्यांनी राजन यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. 

आरबीआयचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन हे योग्य नसून त्यांना शिकागोला पाठवा असं वादग्रस्त वक्तव्य स्वामी यांनी केलं होतं. त्यांच्यामुळं देशातल्या व्याजदरात मोठी वाढ वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला होता.