मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर देत असतात. अशीच एक ऑफर स्पाइस जेट या विमान कंपनीने जाहीर केली आहे. देशांतर्गत प्रवासाचं भाडं हे फक्त ८२६ रूपये ठेवण्यात आलं आहे तर आंतरराष्ट्रीय प्रवासाचं दर हे ३०२६ रुपये ठेवण्यात आलं आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर काही तिकिटांची विक्री केली जाणार आहे. स्पाइस जेटची विशेष योजना १ ते १२ फेब्रुवारी दरम्यानच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी लागू आहे. पण यासाठी तिकिटाची खरेदी २७ जानेवारी २०१६ पर्यंत करावी लागणार आहे. ऑफरमधील तिकीट रद्द केल्यास पैसे रिफंड केले जाणार नाहीत. तिकीट ऑनलाईन पद्धतीने खरेदी करु शकता