फ्लॅट बुकिंग केल्यानंतर मिळण्यास उशीर झाल्यास बिल्डरला २० हजारांचा दंड

 फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा आहे. राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने ग्राहकांच्या बाजुने एक मोठा निर्णय दिलाय. फ्लॅट बुकिंग केल्यानंतर तो मिळण्यास उशिर झाला तर बिल्डरला दर महिना २० हजार रुपयांचा दंड बसू शकतो.

Updated: Jan 26, 2016, 07:36 PM IST
फ्लॅट बुकिंग केल्यानंतर मिळण्यास उशीर झाल्यास बिल्डरला २० हजारांचा दंड title=

नवी दिल्ली :  फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा आहे. राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने ग्राहकांच्या बाजुने एक मोठा निर्णय दिलाय. फ्लॅट बुकिंग केल्यानंतर तो मिळण्यास उशिर झाला तर बिल्डरला दर महिना २० हजार रुपयांचा दंड बसू शकतो.

बिल्डरकडून १७५ स्क्वेअर मीटर आणि त्यापेक्षा जास्त स्क्वेअर मीटर फ्लॅट बुक केला असेल. हा फ्लॅट देण्यास  बिल्डरने उशिर केला दर त्याला त्यानुसार दंड ठोठवण्याचा निर्णय राष्ट्रीय ग्राहक निवरण आयोगाने केलाय. १७५ स्क्वेअर मीटरला १५ हजार तर त्यापुढील मोठ्या फ्लॅटसाठी २० हजार रुपये दंड आकरण्यात येईल, असा निर्णय राष्ट्रीय ग्राहक निवरण आयोगाने दिलाय. हा निर्णय लखनऊ येथील गोमतीनगर प्रकल्पाबाबत एका प्रकरणात दिलाय.

५४ महिन्यानंतर बिल्डरला दंड केलेली रक्कम मिळण्यास सुरु होईल. लखनऊ येथील एका बिल्डरने सांगितले की, सर्व मान्यता मिळाल्या आहेत. मात्र, ज्यावेळी ग्राहक साईटवर गेले असता त्यांना काम ठप्प असल्याचे लक्षात आले. असे असताना हे कडक पाऊल उचलण्यात आलेय.

२००६ मध्ये बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केले होते. अॅग्रीमेंट प्रमाणे ग्राहकाला ४२ महिन्याच्या आत फ्लॅट देणे आवश्यक होते. मात्र, तसे झालेले नाही. याबाबत राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंत आयोगाने हा निर्णय दिलाय.